ऱ्होड आयलंड
ऱ्होड आयलंड : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ईशान्येकडील न्यु इंग्लंड या सहा राज्यांच्या विभागीय प्रदेशातील एक राज्य, तसेच देशातील मूळ तेरा वसाहतीपैंकी एक वसाहत. क्षेत्रफळ ३, १४४ चौ. किमी. पैकी ४२८ चौ. किमी. अंतर्गत जलाशयांखाली. लोकसंख्या ९,७५,००० (१९८६ अंदाज). दक्षिणोत्तर कमाल लांबी ७७ किमी. व पूर्व-पश्चिम कमाल रुंदी ६० किमी.